गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी ‘गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान मे’ याचा प्रत्यय दिला. दिवाळीसारख्या सणाला गडचिरोली शहर परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या गरीब, भटक्या लोकांना त्यांनी विविध साहित्य वाटप करून दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतले.
परिस्थितीमुळे गोरगरीब लोक दिवाळीसारखा सण साजरा करू शकत नाही. त्यामुळे खा.अशोक नेते यांनी त्या लोकांच्या ठिकाण्यांवर जाऊन त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरावा यासाठी माणुसकीच्या नात्यातून दिवाळीची भेट दिली. त्यात कपडे, मिठाई, फटाके, फराळ यासोबत काही आर्थिक मदतही दिली. या अनपेक्षित भेटीने त्या लोकांचा आनंद द्विगुणित झाला.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, गजानन येनगंदलवार, उपाध्यक्ष भारत खटी, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, न.प.चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, भाजपा उपाध्यक्ष अरूण हरडे, माजी जि.प.अध्यक्ष समया पसुला, प्रशांत भुगुवार, संजय बारापात्रे, श्रीकांत पतरंगे, विनोद देवोजवार, श्याम वाढई, अविनाश विश्रोजवार, दतु माकोडे, लोहंबरे, विजय शेडमाके, बंटी खडसे, जनार्दन साखरे, नरेंद्र भांडेकर तसेच भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.