गडचिरोली : भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.मनमोहन सिंग यांना शुक्रवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात हा कार्यक्रम झाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, माजी नगरसेवक रमेश चौधरी, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, आदिवासी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.आशिष कोरेटी, आरमोरीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेलचे अध्यक्ष अब्दुल पंजवानी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, उत्तम ठाकरे, संजय मेश्राम, गुलाब मडावी, गौरव आलाम, विलास जुवारे, माजिद सय्यद, स्वप्नील बेहरे, प्रफुल आंबोरकर, माजिद सय्यद, सुधीर बांबोळे, जितेंद्र मुणघाटे, सर्वेश पोपट, अभिजीत धाईत, जावेद खान, हंसराज उंदीरवाडे, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, केशव सामृतवार, सुनिता रायपूरे, पौर्णिमा भडके, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रिता गोवर्धन यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.