Home दैनंदिन बातम्या 18 आणि 22 मार्चला होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

18 आणि 22 मार्चला होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

प्रवेशपत्र महाआयटी पोर्टलवर

गडचिरोली : जिल्ह्यातील बेरोजगारांचे आशास्थान असलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या यावर्षी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचण्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी 18 आणि 22 मार्च अशा दोन तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सुरूवातीला चालक पोलीस शिपाई पदासाठी 18 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे, तर 22 मार्चला पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या दोन्ही लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उमेदवारांना महाआयटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.

उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडू नये. तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्षातील दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.