Home क्राईम 12 हजाराच्या लाचप्रकरणी जि.प.च्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई

12 हजाराच्या लाचप्रकरणी जि.प.च्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई

शिपाई निसारलाही एसीबीचा दणका

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कामाचे 12 लाखांचे बिल काढून देताना 2 टक्के रक्कम, अर्थात 12 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जि.प.चे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. बुधवारी (दि.28) दुपारी त्यांच्यात कार्यालयात केलेल्या या कारवाईने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली. या कथित व्यवहारात सहभागी असल्याच्या आरोपावरून शिपाई ईश्वर निसार यालाही ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत एका कंत्राटदाराचे सहा लाख रुपयांचे देयक प्रलंबित होते. हे देयक काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता बारहाते यांनी 2 टक्के रकमेप्रमाणे 12 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार, गडचिरोली येथील एसीबी कार्यालयाने तक्रारीची पडताळणी करून काल दुपारी कारवाई केली.

शिपाई ईश्वर निसार याच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्वीकारली जात असल्याची माहिती समोर आली.
यानंतर एसीबीच्या पथकाने कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांच्यावर कारवाई सुरू केली. या कथित लाच प्रकरणातील सत्यतेची पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.