Home दैनंदिन बातम्या दिवाळीआधीच धान खरेदीचा मुहूर्त, टीडीसीच्या तीन केंद्रांवर शुभारंभ

दिवाळीआधीच धान खरेदीचा मुहूर्त, टीडीसीच्या तीन केंद्रांवर शुभारंभ

शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

गडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने दिवाळीआधीच धान खरेदीचा मुहूर्त साधत तीन केंद्रांवर धान खरेदीचा शुभारंभ केला. एकूण 20 केंद्रांवर ऑनलाईल नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच इतरही केंद्रांवर धान खरेदी सुरू होणार आहे.

आरमोरी अधिनस्त आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था, कुरुंडीमाल आणि महामंडळाचे गोदाम, पिंपळगाव, तसेच कुरखेडा तालुक्यातील महामंडळाचे गोदाम, देऊळगाव (शिरपूर) या खरेदी केंद्रांचे उद्घाटन गुरूवारी महामंडळाचे संचालक यशवंत चौरीकर, प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे, उपप्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आधारभूत किमतीनुसार धान खरेदीसाठी पणन हंगाम 2026-27 साठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट याअंतर्गत एकूण 54 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यातील 20 खरेदी केंद्रांवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईल नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. सदर केंद्रांवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करुन धान विक्री करावी आणि शासनाच्या योजनेच लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळाने केले आहे.