गडचिरोली : उन्हाळा तापायला सुरूवात झाली असताना सोमवारच्या मध्यरात्री सुरू झालेल्या वादळी वारा पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतात असलेल्या उन्हाळी धान, मका, भाजीपाल्याच्या पीकांचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील कच्चे आंबेही गळू पडले. (अधिक बातमी खाली वाचा)

मध्यरात्री 1 वाजतानंतर सोसाट्याच्या वाऱ्याला सुरूवात झाली. काही वेळानंतर पाऊसही सुरू झाला. यासोबत वातावरणात गारवाही सुटला. त्यामुळे काही भागात गाराही कोसळल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वादळामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे.
आज ढगाळ वातावरण कायम असून काही भागात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
































