
गडचिरोली : येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरात श्रावण कोल्हे व सुनील तिडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी तान्हा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, सागर निंबोरकर यांनी भेट देऊन बालगोपाळ व उपस्थितांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. (खाली वाचा)

बालगोपाळांनी लाकडी सर्जा-राजाला (नंदीबैल) आकर्षकरीत्या घुंगरू, रंगीबेरंगी झुली, बाशिंग व मण्याच्या माळा घालून सजविले होते. सुरुवातीला आरती करून लाकडी बैलांचे पूजन करण्यात आले. नंदीबैल सजावट करून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले होते. काही चिमुकले शेतकऱ्यांच्या वेशभुषेत सहभागी झाले. बालगोपाळांना उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते भेटवस्तूंचे व खाऊचे वितरण करण्यात आले. लक्ष्मी नगरातील महिला व पुरुषांनी सुद्धा उत्सवात सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रामुख्याने तुकाराम तिडके, वेदप्रकाश कोल्हे, सुधीर शेंडे, राकेश माटेटवार, सुनील सोनटक्के, भास्कर ठाकरे, हिराजी धारणे, रजनीश कोल्हे, राधेलाल बिसेन, विनोद जेट्टीवार, रूपाली कोल्हे, गीता माटेटवार, कल्याणी धाईत, शालिनी धारणे, मेघा खंडारे, स्नेहा शेंडे, दिपाली मुनगंटीवार, विभा येरणे, वैशाली वलादी, वंदना बिसेन, होमिता अंबादे, पवन धाईत, मोहन येरणे, नरेश गुमडेलवार, संतोष खोब्रागडे, नितीन तर्वेकर, सचिन एमप्रेडीवार, अविनाश झिलपे, संतोष मसराम, प्रकाश झिंगरे, बंडू निंबोरकर, मोहन येरणे, पंढरीनाथ लाकडे, मंगेश कोतपल्लीवार, नरेश जनबंधू , स्वप्निल कायरकर, अनिल प्यारमवार, गणेश चौधरी, दिवाकर कांबळे, समीर सुरमवार, शंकर रणदिवे, विनोद पोरेड्डीवार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लक्ष्मीनगर वार्डातील नागरिकांनी सहकार्य केले.
































