Home पब्लिक प्रॉब्लेम वनदाव्यांसाठी तीन पिढ्यांची अट शिथिल करा, शेतकऱ्यांची मागणी

वनदाव्यांसाठी तीन पिढ्यांची अट शिथिल करा, शेतकऱ्यांची मागणी

प्रणय खुणेंच्या नेतृत्वात नागरिकांची निदर्शने

चामोर्शी : तालुक्याच्या भाडभिडी (बी) येथे वनदावा करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत माहिती मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी वनदाव्यांसाठी तीन पिढ्यांची अट शिथिल करण्याची एकमुखी मागणी केली. राष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या नेतृत्वात यावेळी निदर्शने करून मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.

कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून वनपाल चिवाने, महसूलचे मंडळ अधिकारी जाधव, तलाठी येनगंटीवार, ग्रामसेवक प्रकाश कुनघाडकर, वनहक्क समितीचे भास्कर कोवासे, पोलीस पाटील किरण सुरपाम, माजी सरपंच एकनाथ भुरसे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोवासे, मंचू पुंगाटी, वाडीघरे गुरुजी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेला जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक नं.2, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुज, राजूर खुर्द, लभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली, माडेआमगाव, विकासपल्ली, घोट, पेटतळा येथील ज्या शेतकऱ्यांच्या वनजमिनी व वन दावे शासनदरबारी प्रलंबित आहेत, त्या शेतकऱ्यांनी, नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत सर्वांनी वनहक्क दाव्यांबाबत तीन पिढ्यांची अट शिथिल करावी अशी मागणी केली.

उपस्थितांना प्रणय खुणे, कुरखेडा येथील महसूल कार्यालयातील वनहक्क विषयक मार्गदर्शक दीपक सुनतकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, संदीप भोवरे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, संदीप गवारे, बंडू देशमुख, नीलकंठ बुरांडे, एकनाथ वासेकर, श्रीकृष्ण बुरांडे, विठ्ठल बुरांडे, किशोर गवारे, वासुदेव वैरागडे, सुभाष वैरागडे, मेघनाथ वैरागडे, जितेंद्र देशमुख, इंदिरा गवारे, शोभा किरमे, सुशीला सोनटक्के, सुंदरा बुरांडे, वनिता वासेकर, कमल वैरागडे, माया किरमे, सुनंदा वैरागडे,चंद्रकला वासेकर, कांता देशमुख, कीर्ती देशमुख व भाडभिडी येथील महिला, नागरिक, युवक उपस्थित होते.