गडचिरोली : आगामी काळात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तीन पदाधिकाऱ्यांची तीन वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनमंतू मडावी यांचा समावेश आहे.
महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दक्षिण नांदेड आणि भोकर विधानसभा मतदार संघाची, अजय कंकडालवार यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची, तर हनमंतू मडावी यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र जारी केले.
































