गडचिरोली : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवार दि.२४ रोजी गडचिरोलीत महत्वपूर्ण दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यात येऊ घातलेल्या नवीन उद्योगांसंदर्भात त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.
दोन्ही मंत्री सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाच्या भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीला उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता उद्योग विभागाची (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) आढावा बैठक घेतल्यानंतर दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा, तर 12.30 वाजता गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांसंदर्भात बैठक होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधतील.