अहेरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे अहेरी तालुका प्रमुख महेश मोहुर्ले यांनी अनेक युवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचे दुपट्टे गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे अहेरी जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनीही धर्मरावबाबांवर विश्वास टाकत त्यांना साथ देण्याचे ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी बळकटी येत असल्याचे दिसून येत आहे.
महेश मोहुर्ले यांच्यासोबत युवा सेनेचे शाखा प्रमुख सतीश कावळे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोहुर्ले, प्रफुल्ल शेंडे, बंटी गुरनुले, अक्षय गुरुनुले, विक्रम गुरूनुले, श्रीनल लेनगुरे, अविनाश गुरनुले, श्रीकांत गुरनुले, रितिक मोहुर्ले, आशिष गुरनुले, रवी निकुरे, विरू कावळे, राजू मोहूर्ले आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
युवा वर्गात आणि माळी समाजातील सामाजिक कार्यामुळे महेश मोहुर्ले यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. या भागातील जनतेच्या हितासाठी धर्मरावबाबांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, डेव्हिड बोगी, अयान पठाण आदी उपस्थित होते.