चामोर्शी : तालुक्यातील आष्टी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दक्षिण गडचिरोलीकडे मालवाहू वाहनातून जाणारी दारूची खेप रोखली. या कारवाईत तब्बल 12 लाखांची देशी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय 10 लाखांचे वाहनही जप्त करण्यात आले.
आष्टीजवळच्या वनविभागाच्या नाक्यावर हे वाहन क्रमांक एमएच 40, वाय 1905 थांबवून तपासले असता त्यात दारूसाठा दिसून आला. आरोपी राजेश फुलनसिंग यादव (27 वर्ष) आणि अमोल बाजीराव म्हैसकर (35 वर्ष) रा.आलापल्ली यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात पो.उपनिरीक्षक मानकर, पवार, वनवे, हवालदार मडावी, करमे आदींनी केली.