वनसंरक्षक कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाला खासदार अशोक नेते यांची भेट

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना खासदार अशोक नेते.

गडचिरोली : येथील वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत्त कार्यालयासमोर आलापल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरोधात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला शुक्रवारी खासदार अशोक नेते यांनी भेट दिली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा विषय निकाली काढला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी आंदोलकांना दिली.

ठिय्या आंदोलनाचा शुक्रवारी दहावा दिवस होता. या भेटीच्या वेळी वनसंरक्षक एस.रमेशकुमार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे, शंकर ढोलगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.