दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात अभिवादन

जयंती दिनानिमित्त वाहिली आदरांजली

गडचिरोली : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी येथील जिल्हा माहिती कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाळशास्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, मनोज ताजने, विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य अविनाश भांडेकर, तसेच पत्रकार सुरेश नगराळे, शेमदेव चाफले, मिलींद उमरे, माहिती कार्यालयातील कर्मचारी महादेव बसेना, दिनेश वरखडे, स्वप्निल महल्ले, वामन खंडाईत, गुरूदास गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.