गडचिरोली : सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी, तसेच प्रामाणिक आणि चोख काम बजावणाऱ्या, सहकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांना बँको पतसंस्था ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेची यावर्षी सलग तिसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 30 जानेवारीला लोणावळा येथे सहकारी पतसंस्थेच्या “बँको सहकार परिषद 2025” मध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या 100 कोटी ते 125 कोटी ठेवी असलेल्या प्रवर्गातून या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातल्या विविध पतसंस्थांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या नियमावलीनुसार प्रस्तावांचे परीक्षण करुन सहभागी झालेल्या पतसंस्थेच्या प्रस्तावांचे तज्ज्ञ परीक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार निवड केल्या जाते.
सलग तिसऱ्यांदा “बँको ब्लू रिबन” पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, उपाध्यक्ष सुमती मुनघाटे, मानद सचिव सुलोचना वाघरे, संचालक पंडीत पुडके, प्रा.मधुकर कोटगले, पवन मुनघाटे, दिलीप उरकुडे, प्रा.शेषराव येलेकर, दिलीप पाटील खेवले, मुकुंद म्हशाखेत्री, किशोर मडावी, कृष्णा दुधे, संध्या खेवले, पांडुरंग चिलबुले , व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, भूषण रोहणकर यांनी सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.