निरोगी राहण्यासाठी आयुष्यात मैदानी खेळ खेळा – ब्राह्मणवाडे

फराडा येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

चामोर्शी : नवयुवक क्रीडा मंडळ फराडा, ता.चामोर्शी यांच्या वतीने आयोजित रबरी बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले.

मोबाईल, टीव्ही, कॅाम्प्युटरच्या काळात तरुण युवक मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करून ऑनलाईन खेळ खेळत असल्याने अनेक आरोग्यविषयक व मानसिक आरोग्याच्या समस्या तरुणांमध्ये येत आहेत. त्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्याकरीता तरुणांनी दैनंदिन आयुष्यातील काही वेळ मैदानी खेळासाठी राखीव ठेवला पाहिजे, असा संदेश महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी तरुणांना दिला.

यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, डॉ.सुरपाम, विनम लाड, नुमचंद्र भिवनकर, गुरुदास चौधरी, विकास चौधरी, तेजस कोंडेकर, रोहित भैसारे, बंडू हुलके, महेश संदोकर, मनोज देहलकर, मनोज भोयर, वैशाली उदिरवाडे, लोमेश मडावी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होती.