एटापल्ली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडद्वारे संचालित तालुक्यातील सुरजागड लोहखाणीत 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे के.सथी राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक (बेनिफिकेशन) आर.आर. साठपथी यांनी उपस्थितांना संबोधित केले. युनिट हेड सुभाशिस बोस (उपाध्यक्ष-मायनिंग), एल.साईकुमार (एव्हीपी-कॉर्पोरेट अफेअर्स), अरुण रावत (एव्हीपी- एचआर आणि अॅडमिन), संजय चांगलानी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, तसेच विभागीय स्तरावर ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पण आणि शिस्तीसाठी सन्मानित करण्यात आले. लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमूवर्स प्रा.लि.च्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमानंतर कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर करत आनंद व्यक्त केला.