Home दैनंदिन बातम्या ‘छात्रो की गुंज’च्या मॅरेथॉनमध्ये बालकांपासून वृद्धांपर्यंतचे स्पर्धक

‘छात्रो की गुंज’च्या मॅरेथॉनमध्ये बालकांपासून वृद्धांपर्यंतचे स्पर्धक

माझ्याप्रमाणे दुष्यंत यांनाही प्रेम द्या- खा.किरसान

विजेत्या स्पर्धकांना बक्षीसाचा धनादेश देताना दुष्यंत किरसान व काँग्रेसचे पदाधिकारी.

गडचिरोली : काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ या उपक्रमातून प्रेरणा घेऊन, खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीत रविवारी ॲड.दुष्यंत नामदेव किरसान मित्रपरिवाराच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तसेच संपूर्ण विदर्भासह उत्तरप्रदेशातील रहिवासी युवतींनीही सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे 15 वर्षांवरील खुल्या गटात मुलांमध्ये नागपूरच्या मुलांनी, तर मुलींमध्ये उत्तर प्रदेशातील मुलींनी अनु्क्रमे 51 हजार, 31 हजार आणि 21 हजार रुपये याप्रमाणे रोख बक्षिसे पटकावली.

15 वर्षाखालील मुले व मुले आणि 15 वर्षावरील (खुला गट) मुले व मुली अशा एकूण 4 गटात झालेल्या या स्पर्धेत हजारो रुपयांच्या बक्षीसांचे आकर्षण होते. युवकांमध्ये आरोग्य, क्रीडा आणि सकारात्मक ऊर्जेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ॲड.दुष्यंत किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ.विनोद बाबर यांचे यशस्वी जीवनासाठी आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

माझ्याप्रमाणे दुष्यंत यांच्यावरही प्रेम करा- खा.किरसान

या कार्यक्रमादरम्यान खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. माझ्यावर तुम्ही प्रेम केले. तसेच प्रेम दुष्यंत यांनाही द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना उद्देशून केले.

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिकेचे लोकार्पण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथे मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. या अभ्यासिकेमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणार आहे.

या प्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड.दुष्यंत नामदेव किरसान, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुम आलाम, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, वसंत राऊत, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, विजय पाटील गावंडे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, नितीन गोहने, प्रशांत कोराम, प्रमोद गोटेवार, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, माधव गावड, इशुलालजी भालेकर, देवकांत बहिकार, राजेश ठाकूर, देवाजी सोनटक्के, रवींद्र पाल, दत्तात्रय खरवडे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, कुणाल पेंदोरकर, श्रीकांत देशमुख, मनोज ढोरे, हरबाजी मोरे, दिलीप घोडाम, विनोद लेनगुरे, परमेश्वर गावडे, प्रतीक बारसिंगे, विजय लाड, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, उत्तम ठाकरे, धिवरू मेश्राम, जावेद खान, स्वप्नील बेहरे, कमलेश खोब्रागडे, यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक-युवती तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.