गडचिरोली : जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी या मतदार संघात ईव्हीएम मधील मतांचा कौल वेगळा आणि पोस्टल मतदान करणाऱ्या (टपाली मते) मतदारांचा कौल वेगळा असल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. गडचिरोली आणि आरमोरीत पोस्टल मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे, तर अहेरीत अपक्ष उमेदवाराला मतदान केल्याचे दिसून येते.
गडचिरोली मतदार संघात काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांना सर्वाधिक 1194 मते, तर भाजपचे विजयी उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांना 753 मते मिळाली आहेत. याशिवाय अहेरी मतदार संघात अपक्ष उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांना पोस्टल मतदारांची सर्वाधिक 271 मते, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना 228 मते मिळाली आहेत. आरमोरीत मात्र पोस्टल मतदारांची मते वाया गेली नाहीत. या मतदार संघात विजयी झालेले रामदास मसराम यांनाच पोस्टल मतदारांचाही कौल आहे.