रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जिल्ह्यात महिनाभर राबविणार विविध उपक्रम

परिवहन कार्यालयात उद्घाटन सोहळा

गडचिरोली : नवीन वर्षाचा पहिल्या महिन्यात 1 ते 31 जानेवापर्यत रस्ता सुरक्षा अभियान 2025 राबविण्यात येत आहे. सदर अभियानाचा औपचारिक उद्घाटन कार्यक्रम 2 जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्या देखरेखीखाली घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेचे एपीआय शरद मेश्राम, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ.मनिष मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता रुपाली काळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मोटार वाहन निरिक्षक श्रीमती दिघावकर, के.के.शिंदे, वाय.आर. मोडक, जी.आर. धुर्वे, तसेच सहा. मोटार वाहन निरीक्षक आय.आर. मदने, ओ.पी. मेश्राम, पी.डी. येवले, के.एस.पारखी, श्रीमती आर.व्ही. कांबळे, जी.आर.सिंह यांनी विशेष मेहनत घेतली. प्रास्ताविक सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हर्षल बदखल यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती आर.व्ही. कांबळे यांनी केले.