राकाँच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अतुल गण्यारपवार यांचे स्वागत

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. दि.19 जुलै रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात नगरपालिकेचे माजी सभापती तथा पक्षाचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गण्यारपवार यांचे जोरदार स्वागत केले.

शहरात आगमन होताच ढोलताशांच्या गजरात आतषबाजी करून गण्यारपवार यांचे स्वागत करून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नईम शेख, विजय धकाते, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, घोट भातगिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जि.प. सदस्य राजू आत्राम, युवा शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, भास्कर निमजे, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, तालुकाध्यक्षा (महिला) नीता बोबाटे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुनील कत्रोजवार, राजू डांगेवार, संतोष जुमनाके, मल्लया कालवा, सुनील चिमुरकर, प्रफुल्ल लोणारे, संजय मेश्राम, निलेश कोटगले, शेखर मडावी, दिवाकर उंदीरवाडे, मुरलीधर मेश्राम, नरेश कंदिकुरवार, बंडू एलावार, विनोद शेंगर, मधुकर चिंतलवार, भोवरे पाटील, कबीर आभारे, आरती कोल्हे, माया आक्केवार, कल्पना ईप्पावार, बेबी लभाने, प्रतिमा सोरते, सुनीता मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.