नवक्षितीज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मुंबईत कुसुम अलाम यांचा सत्कार

साहित्य क्षेत्रासह सामाजिक योगदान

गडचिरोली : मुंबईतील नव‌क्षितीज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक, साहित्यिक, प्रशासकीय सेवा, क्रीडा, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा माजी पोलीस महानिरीक्षक मोहन राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात गडचिरोलीतून कुसुम अलाम यांचा त्यात समावेश होता. साहित्य आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

मुंबईतील गोरेगावच्या डॉ.भानुबेन नानावटी कलाधर नंदादीप विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंजाबमधील माजी न्यायमूर्ती तथा डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणचे अध्यक्ष अरुण चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक आमदार अनंत बाळा, धडक कामगार युनियनचे सरचिटणीस अभिजित राणे, हास्य कवी इम्रान राही, निवड समितीचे अध्यक्ष अॅड.जगदीश जापले, हास्य सिने अभिनेता रहमान कुरेशी, काँग्रेस नेते क्लाइव्ह डायस, उद्योगपती ईश्वर रणशूर, निर्माता दिग्दर्शक सुनील दर्शन, माजी सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नवक्षितीज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मागील 10 वर्षांपासून विविध क्षेत्रातील योगदानासाठी समाजातील व्यक्तींचा सत्कार केला जातो. यावेळी 116 पेक्षा जास्त सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्थेकडे नामांकन केले होते. त्यापैकी 16 विशेष व्यक्तींची निवड झाली.