लॅायड्स मेटल्स करणार जिल्ह्यात 11 लाख वृक्षांची लागवड

'ग्रीन गडचिरोली' उपक्रम

सीईओ सुहास गाडे यांना रोपटे देताना लॅायड्सचे एमडी बी.प्रभाकरन

गडचिरोली : जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या लॅायड्स मेटल्स या स्टिल उद्योग समुहातर्फे गुरूवारी संध्याकाळी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘ग्रीन गडचिरोली’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत गडचिरोली शहराच्या हद्दीत 30 हजार वृक्ष, तर जिल्हाभरात 11 लाख वृक्ष लावले जाणार आहे. स्टिल इंडस्ट्रीजसाठी पर्यावरणपुरक उपकरणांचा वापर आम्ही करत असलो तरीही आमच्यामुळे थोडेही प्रदुषण वाढू नये, यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला असल्याचे लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी सांगितले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)ने गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी सुरजागड लोहखाण आणि कोनसरीत विविध पर्यावरणपूरक उपक्रम, तसेच गडचिरोली येथे ‘ग्रीन गडचिरोली’ उपक्रमाचा शुभारंभ समारंभपूर्वक करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव, गोंडवाना विद्यापीठाचे प्रा.मनीष उत्तरवार यांच्यासह लॅायड्सचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना बी.प्रभाकरन म्हणाले, खाणकामापासून ते वाहतुकीपर्यंत एलएमईएलने अनेक पर्यावरणपुरक उपक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील चौथी स्लरी पाईपलाइन पुढील काही महिन्यांत कार्यान्वित होईल. यामुळे जीवाश्म इंधनाच्या वापरावर आधारित रस्ते वाहतूक कमी होईल आणि कार्बन फूटप्रिंट देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. कमीत कमी कार्बन उत्सर्जनासह स्टील बनवणे, सर्वसमावेशक विकास, नोकऱ्या, आरोग्य सेवा, शिक्षण यासारख्या अनेक उपक्रमांद्वारे स्थानिक समुदायांना विकासाच्या प्रवाहात आणणे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेली सीईओ सुहास गाडे यांनी एलएमईएलच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले. ‘ग्रीन गडचिरोली’ हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणेशी सुसंगत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांनी केले.

सुरजागड येथे पहिले इलेक्ट्रीक कॅाम्प्रेसर

सुरजागड येथे लियुगॉन्गकडून पहिले भारत इलेक्ट्रिक व्हेईकल ग्रेडर आणि व्होल्वोकडून एलएनजी ट्रक एलएमईएलला सुपूर्द करण्यात आले. तसेच सिम्युलेटर आणि पहिल्या इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर एक्स्कॅव्हेटर ड्रिल रिंगचे औपचारिक उद्घाटन याप्रसंगी बी.प्रभाकरन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश रांजणकर, विविध गावांतील सरपंच आणि उपसरपंच, त्यात अरुणा सडमेक, वनिता कोरामी, नेवलू गावडे, राजू तिम्मा, मधुकर सडमेक, कल्पना आलम, गणेश गोटा, बापूजी गावडे, प्रशांत आत्राम, बलराम सोमनानी आणि एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान, प्रभाकरन यांनी एलएलईएलच्या महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या 35 ई-बाईक्सना हिरवी झेंडी दाखवली. सरपंच आणि उपसरपंचांना आरोग्य कार्ड वितरित केले. स्लरी पाइपलाइनचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी लोहखनिज ग्राइंडिंग युनिटच्या टीमला प्रशस्तीपत्रही दिले.