माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

फुले दाम्पत्य प्रतिष्ठानचा उपक्रम

गडचिरोली : जिल्हा माळी समाज संघटनेच्या वतीने समाजातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुखदेव जेंगटे, तर प्रमुख पाहुण्या म्हणऊन महिलाध्यक्ष कांता लोनबले होत्या. सल्लागार भीमराज पात्रीकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा आजवरचा प्रवास मांडला. प्रमुख मार्गदर्शक किरण गावतुरे यांनी सत्कारापुरता हा कार्यक्रम मर्यादीत न राहता गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करुन पुढे कसे नेता येईल याबाबतचा आदर्श गडचिरोली जिल्हा संघटनेकडून घ्यावा असे म्हटले. (अधिक बातमी खाली वाचा)

सुरज तोरणकर यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करताना आरोग्य जपणे किती महत्वाचे आहे हे स्वानुभवातून विषद केले. ठेवलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आलेच तर प्लान बी तयार ठेवावा, असा सल्ला दिला. साहिल लोनबले यांनी मित्र व जिल्हा माळी संघटना यांच्या सहकार्याने यश संपादन केल्याचे कृतज्ञतापुर्वक कबुल करुन चांगल्या संगतीत राहण्याचे महत्व विषद केले. प्रा.संजय लेनगुरे, मोहिनी मोहुर्ले यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी 10 वी मधील गुणवंत मंजिरी सुदर्शन मोहुर्ले, सानिका मुक्तेश्वर कोटरंगे, संचिता भाष्कर शेंडे, प्रतिक सोनुले, आर्या नुतन लेनगुरे, शिवम ज्ञानेश्वर निकोडे, माही घनशाम मांदाडे, समृद्धी राजेंद्र आदे, प्रणय बालाजी रस्से, भाग्यश्री श्रावण गुरनुले, तोशिका कैलास सुर्यवंशी, तसेच 12 वी मधील गुणवंत प्राची निकोडे, नेहा रमेश लोनबले, विकास नंदकिशोर लोनबले, मोनाली विष्णु निकोडे, वैष्णवी गुरुदास मोहुर्ले तसेच अरुणा मारोती जेंगटे- वाढई (पर्यवेक्षिका), चेतन कुसन जेंगटे (आरोग्य सेवक), डॉ.देवेश्री शामराव सोनुले (BHMS), वनिता गजानन जेंगठे-मांदाडे (आरोग्य सेविका) यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचा सत्कार, तथा दिशा लोनबले हिने राज्यस्तरीय बॅाक्सिंग स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

संचालन नरेंद्र रस्से यांनी, तर आभार प्रभाकर कोटरंगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी रमेश जेंगठे, योगेश सोनुले, अशोक मांदाडे, गुरुदास बोरुले, फुलचंद गुरनुले, पुरण पेटकुले, किरण शेंडे, नरेंद्र निकोडे, किसन सोनुले, संतोष मोहुर्ले, शंकर चौधरी, लक्ष्मण मोहुर्ले, भाष्कर गुरनुले आदींनी सहकार्य केले.