गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील निसर्गरम्य मुतनुर (पहाडी) येथे आज गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यात्रेचे आयोजन केले आहे. या पहाडावर आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थान आहे. या ठिकाणी खालच्या भागात खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख डॅा.प्रणय खुणे परिवार (गुरनोली) यांचे आराध्य दैवत आदिशक्ती दुर्गामाता मंदिर आहे. या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडवा (मराठी नववर्ष) निमित्त गावकऱ्यांच्या वतीने यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

संपूर्ण मुतनूर व परिसरातील यात्रेकरू भाविकांसाठी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा महापुजेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त भाविकांनी या महापुजा आणि विविध कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख प्रणय खुणे यांच्यासह लोकेश डोंगरवार, राकेश डोंगरवार, राहुल झोडे, दिनेश खुणे व संपूर्ण खुणे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

विशेष म्हणजे धार्मिक कार्यक्रमांसोबतच मुतनूर पहाडाच्या परिसरात अनेक लोक पर्यटनासाठीही येतात. तेथील निसर्गरम्य परिसरामुळे काही क्षण निवांत अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात. प्रशासनाने या ठिकाणाचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा अशी मागणी होत आहे.



































