गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे प्रदेश सचिव रविंद्र दरेकर यांच्याकडे नागपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांची जबाबदारी दिली आहे. त्यात काटोल आणि सावनेर या मतदार संघांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी काढलेल्या नियुक्तीपत्रात दरेकर यांच्याकडे काटोल आणि सावनेर या विधानसभा मतदार संघांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. रामटेक लोकसभा मतदार संघाअंतर्गत या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.
































