गडचिरोली : बदलापूर येथे शाळकरी मुलीशी झालेले कृत्य हे अमानवीय आहे. असा प्रकारचे अमानवीय कृत्य आरमोरी, नागभीड आणि राज्यातील इतरही भागात घडले आहे. मात्र राज्य सरकार अशा घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरत आहे असा आरोप करत राज्यातील महायुती सरकारचा महाविकास आघाडीच्या वतीने मूक निषेध करण्यात आला. हाताला आणि तोंडाला काळ्या फिती बांधून हा निषेध नोंदविण्यात आला.
या निषेध आंदोलनात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर अध्यक्ष विजय गोरडवार, कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, मा.क.पं.चे जिल्हा सचिव देवराव चवळे, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजित कोवासे, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख छाया कुंभारे, डॉ.सोनल कोवे, माधवराव गावड, अ.जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, याशिवाय रुपेश टिकले, अब्दुल पंजवानी, दत्तात्रय खरवडे, अतुल मल्लेलवार, प्रभाकर वासेकर, सुनील चडगुलवार, देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, प्राचार्य लांजेवार, प्रभाकर वासेकर, चारुदत्त पोहाने, राकेश रत्नावार, गौरव येनप्रेड्डीवार, उत्तम ठाकरे, स्वप्नील ताडाम, जावेद खान, सुरेश भांडेकर, माजिद सय्यद, सुभाष धाईत, अविनाश श्रीरामवार, आरती खोब्रागडे, पुरषोत्तम सिडाम, सर्वेश पोपट यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.