सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्लासफोर्डपेठा येथे आरोग्य केंद्राची ईमारत सुस्थितीत नसल्यामुळे परिसरातील नागरीक उपचारासाठी सिरोंचा येथे जात होते. त्यामुळे नागरिकांना नाहक वेळ आणि पैशाचा भुर्दड सोसावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनस्तरावर पाठपुरवठा करून, ग्लासफोर्डपेठा येथील आरोग्य केंद्रासाठी नवीन ईमारत मंजुर केली. आता ग्लासफोर्डपेठासह परिसरातील नागरिकांना उपचार घेण्याची सोय आपल्या गावातच होणार आहे.
आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचे भूमिपूजन करताना सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, राष्ट्रवादी काँगेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेली, ग्राम पंचायत सदस्य रवि कर्सपल्ली, रवेंद्र कावरे, शंकर गड्डी, संजीवकुमार मेडी, तिरुपती बोगडामिदी, रमेश आसाम, कावरे पोच्याम येल्लाय्या, कावरे पोच्याम नानाय्या, मदनय्या मधेशी, व्यंकटेश पुजारी, रमेश माने यांच्यासह राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.