Home दैनंदिन बातम्या ‘जोडे मारो’ आंदोलनातून व्यक्त केला अभियंत्यावरचा रोष

‘जोडे मारो’ आंदोलनातून व्यक्त केला अभियंत्यावरचा रोष

कारवाईसाठी पुन्हा एक आंदोलन

गडचिरोली : गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाईसह निलंबित करण्याच्या मागणीसाठी बुधवारी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर प्रतिकात्मक जोडे मारा आंदोलन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार व आंदोलकांनी जोरदार नारेबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

साखरवाडे यांच्या कार्यकाळातील पूल बांधकाम, निविदा प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवरून गैरप्रकाराचा आरोप करत कात्रटवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. आठ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत साखरवाडे यांची इतर जिल्ह्यात बदली करावी, अशीही आंदोलकांची मागणी आहे.

दरम्यान बुधवार 17 जून रोजी लांजेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 च्या कार्यालयासमोर ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. अभियंता साखरवाडे यांच्या पोस्टरला जोडे-टप्पल मारून रोष व्यक्त करण्यात आला. यापूर्वी डफरे बजाओ आंदोलन, प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा साखरवाडे यांची पाठराखण करीत आहे, असा आरोपही कात्रटवार यांनी केला. यासंदर्भात अरविंद कात्रटवार यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

या आंदोलनप्रसंगी यादव लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, जगन चापले, यादव चौधरी, बळीराम गेडाम, तानबा दजगाये, शुभम कुकडकर, भूषण लोहंबरे, भीमराव ठाकरे, चांगदेव कोहपरे, गणेश वाघमारे, पितांबर नैताम, नक्टू कलसर, राहुल ठाकरे, भूषण ठाकरे, शुभम समर्थ, प्रवीण म्हस्के, अजय संदोकर, विजय मत्ते, बालाजी चापले, भवन चापले, पूनम झंझाळ, निखिल कुढवे, विकी वाडणकर, विकास ठाकरे, राहुल ठाकरे, साहिल कोहपरे, रोहित चणेकार, चैतन्य मेश्राम, ढिसू ढवळे, लक्ष्मण चौधरी, राजेंद्र ढवळे, दुर्योधन भैसारे, सुधाकर ढवळे, भूषण गुरुकार, महेश खेडेकर, चंद्रशेखर पेंदाम, सुनील कोसमशिले, मनोहर कोसमशिले, दीपक कोसनशिले, प्रशांत मडावी, मंगल भरणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.