माजी खा.अशोक नेते यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा होणार

कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे आयोजन

गडचिरोली : भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 1 जुलै रोजी काही सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यात सकाळी 9 वाजता सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा व वृक्षारोपण, त्यानंतर मातोश्री वृद्धाश्रम चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ब्लँकेटचे वाटप व वृक्षारोपण, ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत अशोक नेते यांच्या निवासस्थानामागील खुल्या जागेत, तसेच कॅम्प एरियामधील हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दुपारी 1 वा ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे फळ वाटप, दुपारी 4 वाजता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे वृक्षारोपण व फळ वाटप, तर सायंकाळी 7 वाजता भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या कार्यक्रमांला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.