Home दैनंदिन बातम्या जिल्हा नियोजन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

जिल्हा नियोजन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

सहपालकमंत्री जयस्वाल येणार

गडचिरोली : नवीन आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात होणार आहे.

राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, तथा कामगार विभागाचे राज्यमंत्री असलेले ॲड.जयस्वाल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दौरा कार्यक्रमानुसार सहपालकमंत्री जयस्वाल यांचे गडचिरोली येथे दुपारी 3 वाजता आगमन झाल्यानंतर नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहावर आगमन होऊन त्यांचा वेळ राखीव राहील. रात्री सोयीनुसार गडचिरोलीवरून रामटेककडे प्रयाण करतील.