भाजपा गडचिरोली तालुका व शहर अध्यक्षपदी सुत्रपवार व कुनघाडकर

नवीन पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोलीच्या तालुका व शहर अध्यक्षपदासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा रविवारी (दि.20 एप्रिल) गडचिरोली येथे करण्यात आली. ही घोषणा आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्यकक्षातील जनसंपर्क कार्यालयात माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यात गडचिरोली तालुकाध्यक्षपदी दत्तु तुकाराम सुत्रपवार तर शहराध्यक्षपदी अनिल पांडुरंग कुनघाडकर यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. या प्रसंगी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, निवडणूक प्रक्रिया प्रमुख व जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, सहनिवडणूक प्रमुख अॅड.चाटे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर येनगंदलवार, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, माजी तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आतषबाजी करत पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या निवडीमुळे गडचिरोली तालुका व शहरातील भाजपा संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.